Aarti Badade
लवंग हा एक छोटासा मसाला असून त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. चहामध्ये टाकल्यास त्याचा प्रभाव अधिक वाढतो.
लवंगामध्ये असलेले युजेनॉल नावाचे संयुग छाती व श्वसन मार्ग साफ करते. सर्दी, खोकला, सायनस यावर आराम मिळतो.
लवंग अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल आहे. त्यामुळे लवंग चहा दररोज घेतल्यास संसर्ग दूर राहतात.
लवंग पाचक रस तयार करण्यास मदत करते. अपचन, गॅस, पोटफुगी यांसारख्या तक्रारी कमी होतात.
पावसाळ्यात बुरशीचा धोका वाढतो. लवंग शरीर डिटॉक्स करते आणि त्वचा व आरोग्याचे रक्षण करते.
दररोज चहात फक्त १-२ लवंगा टाका. चवही वाढेल आणि आरोग्यही टिकेल.
लवंगाचा चहा पिल्याने पोट हलके वाटते, सुजलेपणा कमी होतो आणि ऊर्जा मिळते.
पावसात गरम चहा व लवंग म्हणजे उत्तम आरोग्यदायी कॉम्बो! आजपासून चहात लवंग घालायला सुरुवात करा.