Aarti Badade
पावसाळ्यात खोकला आणि दम्याचा त्रास होत असतो.
खोकला ओला (कफ पडणारा) आणि कोरडा (कफ न पडणारा) असे दोन प्रकारचा असतो.
छातीला तिळाचे तेल लावून शेकावे, सितोपलादी, पिंपळी चूर्ण मधासह घ्यावे.
गरम पाण्यात तुळस, दालचिनी, गवती चहा घालून उकळून ते पाणी प्यावे.
छाती गरम राहावी म्हणून स्वेटर घालावा, कानाला रुमाल बांधावा.
जेवणात दही, आंबट ताक पूर्णपणे टाळावे.
१ चमचा ज्येष्ठमध पावडर दोन कप पाण्यात उकळून ते पाणी वरचेवर प्यावे.
ढगाळ वातावरणाचा त्रास दम्याच्या रुग्णांना जास्त होतो. ज्येष्ठमध पावडर, नारायण तेल यांचा वापर करून चिकट कफ लवकर सुटतो.
दमा असल्यास वेळेवर जेवण करावे, उशिरा जेवण आणि गॅसेस टाळावेत. केळीचे शिकरण, दही पूर्णपणे वर्ज्य करावे. जुनाट दम्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.