Aarti Badade
दही तडका हा अगदी सोप्या साहित्यात आणि चटकन तयार होणारा पदार्थ आहे, जो भाकरी, चपाती किंवा भातासोबत उत्तम लागतो.
Sakal
१ कप दही एका भांड्यात घ्या आणि ते चांगले फेटून घ्या, जेणेकरून त्यात गाठी राहणार नाहीत.
Sakal
फेटलेल्या दह्यामध्ये १/२ चमचा जिरेपूड, १/४ चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करा.
Sakal
एका लहान कढईत १ चमचा तेल गरम करा. त्यात १/२ चमचा मोहरी आणि १/२ चमचा जिरे घाला.
Sakal
मोहरी आणि जिरे तडतडल्यावर त्यात चिमूटभर हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करा.
Sakal
ही गरम फोडणी लगेचच तयार दह्याच्या मिश्रणात घाला आणि चांगले मिसळून घ्या, ज्यामुळे त्याला तडक्याची चव येईल.
sakal
आवडीनुसार बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो किंवा हिरवी मिरची घाला. कोथिंबीरने गार्निश करून गरमागरम सर्व्ह करा!
Sakal