Aarti Badade
बीट पराठा बनवणे खूप सोपे आहे! बीटचे सर्व पोषण आणि मसाल्याची चव एकाच गरमागरम पराठ्यात मिळते.
Sakal
१ मोठे बीट स्वच्छ धुवून किसून घ्या. त्यात कणीक, बेसन, बारीक मिरची, आले-लसूण पेस्ट आणि सर्व मसाले एकत्र करा.
Sakal
किसलेल्या बीटामध्ये पाणी असल्यामुळे, गरजेनुसार थोडेच पाणी वापरून हे सर्व मिश्रण मळून घ्या आणि मऊ कणिक तयार करा.
Sakal
कणकेचे छोटे गोळे तयार करा. ते कोरड्या पिठात घोळवून मग जास्त पातळ न करता मध्यम जाडीचा गोल पराठा लाटून घ्या.
Sakal
तवा चांगला गरम झाल्यावर पराठा त्यावर टाका आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजा.
Sakal
पराठा पलटल्यावर त्यावर तेल किंवा तूप लावा आणि दाबून-दाबून दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्या.
Sakal
हा पौष्टिक आणि स्वादिष्ट बीट पराठा दही, लोणचे किंवा टोमॅटो सॉस सोबत गरमागरम सर्व्ह करा!
Sakal
Sakal