तणावातून बाहेर पडा! मेंदू शांत ठेवणारे 5 झटपट उपाय

Aarti Badade

धावपळीच्या जीवनात मनाची शांतता

आधुनिक सोयी-सुविधा वाढल्या असल्या तरी कामाचा ताण आणि भविष्याची चिंता यामुळे जीवनातील शांतता कमी झाली आहे.

Stress relief tips

|

Sakal

ताण व्यवस्थापन

मनावरील ताण आरोग्यासाठी घातक असतो, त्यामुळे छोट्या उपायांनी तणावाचे व्यवस्थापन करणे आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे.

Stress relief tips

|

Sakal

प्रिय व्यक्तींसोबत वेळ घालवा

डिजिटल गॅझेट्स बाजूला ठेवून कुटुंब आणि मित्रांसोबत गप्पा मारल्यामुळे मानसिक दडपण निम्म्याने कमी होते.

Stress relief tips

|

Sakal

नियमित मेडिटेशन

रोज सकाळी काही वेळ ध्यानधारणा आणि योगासने केल्यामुळे मन शांत होऊन आंतरिक ऊर्जा वाढण्यास मदत होते.

Stress relief tips

|

Sakal

नकारात्मक विचारांना दूर ठेवा

सतत वाईट विचार केल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडते, म्हणून जाणीवपूर्वक सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरते.

Stress relief tips

|

Sakal

आवडीचा छंद जोपासा

लिहिणे, चित्रकला किंवा बागकाम यांसारख्या आवडीच्या छंदासाठी वेळ काढल्यामुळे मन रिफ्रेश होते आणि कामाचा ताण विसरायला होतो.

Stress relief tips

|

Sakal

आवडीचे संगीत ऐका

डोळे बंद करून शांत किंवा आवडीची गाणी ऐकल्याने मेंदूतील स्ट्रेस हार्मोन्स कमी होऊन त्वरित रिलॅक्स वाटते.

Stress relief tips

|

Sakal

स्वतःसाठी थोडा वेळ काढा

दिवसभरातील फक्त १० मिनिटे स्वतःच्या आनंदासाठी दिल्यास तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक फिट राहू शकता.

Stress relief tips

|

Sakal

वजन आणि फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय! रोज प्या 'हे' पाणी!

Black coffee for liver fat and weight loss

|

Sakal

येथे क्लिक करा