Aarti Badade
अनेकजण कॉफीकडे केवळ ऊर्जा वाढवणारे पेय म्हणून पाहतात, पण साखर आणि दुधाशिवाय घेतलेली ब्लॅक कॉफी तुमच्या लिव्हरसाठी औषधासारखी काम करू शकते.
Black coffee for liver fat and weight loss
Sakal
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट यांच्या मते, ब्लॅक कॉफी ही यकृतातील साचलेली अतिरिक्त चरबी (Fat) नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करते.
Black coffee for liver fat and weight loss
Sakal
जर तुम्ही कॉफीमध्ये दूध आणि साखर मिसळली, तर तिचे औषधी गुणधर्म नष्ट होतात. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी 'प्युअर' ब्लॅक कॉफीच सर्वोत्तम ठरते.
Black coffee for liver fat and weight loss
Sakal
संशोधनानुसार, दिवसातून ३ ते ४ कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास लिव्हरमधील चरबीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते आणि लिव्हरचे गंभीर आजारांपासून संरक्षण होते.
Black coffee for liver fat and weight loss
Sakal
ब्लॅक कॉफीमुळे शरीराची चयापचय क्रिया वेगवान होते. यामुळे संपूर्ण शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत मिळते आणि यकृतामध्ये पुन्हा चरबी साचण्यास प्रतिबंध होतो.
Black coffee for liver fat and weight loss
Sakal
फॅटी लिव्हरची समस्या अनेकदा कोणतीही लक्षणे न दाखवता उद्भवते. तरीही सतत येणारा थकवा आणि पोटाच्या उजव्या बाजूला अस्वस्थता जाणवणे हे प्राथमिक संकेत असू शकतात.
Black coffee for liver fat and weight loss
Sakal
लिव्हरसोबतच ब्लॅक कॉफी मानसिक सतर्कता वाढवते, वजन कमी करण्यास मदत करते आणि टाईप-२ मधुमेहाचा धोका कमी करण्यासही उपयुक्त ठरू शकते.
Black coffee for liver fat and weight loss
Sakal
अति प्रमाणात कॉफी पिण्याने झोप न येणे किंवा चिडचिड होणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या प्रकृतीनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे.
Black coffee for liver fat and weight loss
Sakal
Bluetooth Cancer Risk myth
Sakal