सकाळ डिजिटल टीम
मधमाशी चावल्यास घाबरू न जाता कोणते घरगुती उपाय करावे जाणून घ्या.
जर तुम्हाला मधमाशीने चावा घेतला तर, त्वरीत मधमाशीचे विषारी भाग (डंक) काढा. त्यानंतर, चावलेल्या भागावर थंड पाण्याने धुवा आणि बर्फ लावा.
मधमाशीने चावा घेतलेल्या भागावर बर्फ लावल्याने सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
दुखणे आणि सूज कमी करण्यासाठी वेदनाशामक (painkillers) तुम्ही घेवू शकतात.
जर तुम्हाला एलर्जीची प्रतिक्रिया येत असेल, तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.
मधमाशी चावल्यास काही लोकांना गंभीर ऍलर्जीक प्रतिक्रिया येऊ शकते, ज्यामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे आणि बेशुद्ध होणे इत्यादींचा समावेश असू शकतो.
मधमाशीच्या डंकाची ऍलर्जी असण्याची शक्यता असते, त्यामुळे जर तुम्हाला पूर्वी कधी ऍलर्जी झाली असेल, तर त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.
जर तुम्हाला मधमाशी चावली असेल तर चावा घेतलेल्या ठिकाणी लोखंडाचा तुकडा तुम्ही लावू शकतात थोड्यावेळानी या वेदना कमी होण्यास मदत होईल.
मधमाशीच्या डंकांचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी चुना देखील तुम्ही वापरू शकतात.