सनटॅनला रामराम! पिंक ग्लोसाठी बीटचा घरगुती उपाय करेल कमाल

Aarti Badade

उन्हाचा तडाखा आणि त्वचा

उन्हाळ्याला सुरुवात होताच सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचा काळी पडते, टॅनिंग वाढते आणि चेहरा निस्तेज होतो. महागड्या क्रीम्सपेक्षा बीटचा वापर नैसर्गिक ग्लोसाठी सर्वोत्तम ठरतो.

Beetroot face pack for glowing skin

|

Sakal

बीट - त्वचेसाठी वरदान

बीटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि लोहाचे प्रमाण भरपूर असते. हे घटक चेहऱ्यावरील काळे डाग घालवून मृत त्वचा (Dead Skin) काढून टाकण्यास मदत करतात.

Beetroot face pack for glowing skin

|

sakal

बीट आणि मधाचा फेसपॅक

वाटीमध्ये बीटचा रस घेऊन त्यात मध मिक्स करा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक येईल.

Beetroot face pack for glowing skin

|

Sakal

टॅनिंगसाठी बीट आणि लिंबू

बीटच्या रसात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. लिंबातील ब्लीचिंग गुणधर्म आणि बीटमधील पोषक तत्वे जिद्दी टॅनिंग त्वरित काढून टाकतात.

Beetroot face pack for glowing skin

|

sakal

केमिकल प्रॉडक्ट्स

बाजारातील महागड्या ट्रीटमेंटमुळे काही काळ चेहरा चमकतो, पण कालांतराने सुरकुत्या वाढतात. बीटचा वापर केल्याने त्वचेचा पोत सुधारतो आणि नैसर्गिक उजळपणा कायम टिकतो.

Beetroot face pack for glowing skin

|

Sakal

आठवड्यातून किती वेळा वापरावे?

त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आणि चेहऱ्यावरील ओलावा टिकवण्यासाठी आठवड्यातून किमान एक किंवा दोनदा बीटचा फेसपॅक नक्की लावावा.

Beetroot face pack for glowing skin

|

Sakal

घरगुती उपाय, कायमस्वरूपी रिझल्ट

स्वयंपाकघरातील हा छोटासा बीटचा तुकडा तुमच्या त्वचेचे सौंदर्य खुलवू शकतो. आजच हा उपाय करून पहा आणि मिळवा डागमुक्त, सुंदर आणि चमकदार त्वचा!

Beetroot face pack for glowing skin

|

sakal

थंड चहा पिणे आरोग्यासाठी वरदान की शाप?

Cold tea benefits and side effects

|

Sakal

येथे क्लिक करा