Aarti Badade
महाराष्ट्रीयन जेवणात कोशिंबीर हा महत्त्वाचा प्रकार आहे. बीटाची कोशिंबीर केवळ चवीलाच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी मानली जाते.
Beetroot Salad koshimbir Recipe
Sakal
बीट वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असून रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. ज्यांना रक्ताची कमतरता आहे, त्यांच्यासाठी हे वरदान आहे.
Beetroot Salad koshimbir Recipe
Sakal
ही कोशिंबीर बनवण्यासाठी बीट, दही, शेंगदाणा कूट, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरे-मोहरी, साखर आणि चवीनुसार मीठ इतकेच साहित्य लागते.
Beetroot Salad koshimbir Recipe
Sakal
सुरुवातीला बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या. त्यानंतर बारीक किसणीने बीट किसून घ्या आणि त्यातील अतिरिक्त पाणी पिळून काढून किस मोकळा करा.
Beetroot Salad koshimbir Recipe
sakal
एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून तडतडीत फोडणी द्या. ही फोडणी पूर्णपणे थंड होऊ द्या.
Beetroot Salad koshimbir Recipe
Sakal
बीटाच्या किसामध्ये दाण्याचा कूट, साखर, मीठ, कोथिंबीर आणि दोन मोठे चमचे सायीचे दही घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
Beetroot Salad koshimbir Recipe
Sakal
शेवटी तयार केलेली थंड फोडणी बीटाच्या मिश्रणात घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा. तुमची रुचकर आणि पौष्टिक बीट कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे!
Beetroot Salad koshimbir Recipe
Sakal
Kadhi Pakoda Dahi Bhindi recipe
sakal