सकाळ डिजिटल टीम
बऱ्याच लोकांना बिट खायला आवडत नाही. पण याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत.
जर तुम्हालाही बिट खायला आवडत नसेल तर बिट पासून चविष्ट आणि पौष्टिक लाडू कसे बनवावे जाणून घ्या.
बिटचे लाडू बनवण्यासाठी बीट (किसलेले किंवा वाटलेले), साखर (चवीनुसार), तूप वेलची पूड, डेसिकेटेड खोबरे (ऐच्छिक), सुका मेवा (बदाम, पिस्ता, मगज इत्यादी - ऐच्छिक), डिंक (ऐच्छिक) हे साहित्य लागते.
बिटचे लाडू बनवण्याची योग्य कृती (पध्दत) जाणून घ्या.
बीट स्वच्छ धुऊन, साल काढून किसून किंवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यानंतर नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करा आणि त्यात बीटची पेस्ट घाला. चांगले परतून घ्या.
आवश्यकतेनुसार साखर घाला आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत परतावे.
वेलची पूड आणि तुमच्या आवडीनुसार डेसिकेटेड खोबरे, सुका मेवा, डिंक घालून चांगले एकत्र करून घ्यावे.
मिश्रण थोडे कोमट झाल्यावर किंवा पूर्ण थंड झाल्यावर हाताने लाडू वळून घ्यावे.
हे लाडू तुम्ही २०-२५ दिवस आरामात साठवून खाऊन ठेवू शकतात.