kimaya narayan
बॉलिवूडमधील एक वादग्रस्त ठरलेली बाप-लेकीची जोडी म्हणजे महेश आणि पूजा भट्ट.
पूजा ही महेश यांची मोठी मुलगी आहे. त्यांची पहिली पत्नी किरणने 24 फेब्रुवारी 1972 ला पूजाला जन्म दिला.
काही काळाने पूजाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेत्री म्हणून नाव कमावलं असलं तरीही ती बॉलिवूडमधील वादग्रस्त आणि बोल्ड अभिनेत्री ठरली.
सडक, दिल है के मानता नहीं, चाहत, जख्म हे पूजाचे सिनेमे खूप गाजले.
नव्वदच्या दशकात पुजाचं वडील महेश भट्ट यांच्याबरोबरचं लिपलॉक फोटोशूट व्हायरल झालं. यामुळे त्या दोघांवरही प्रचंड टीका झाली.
स्टारडस्ट मॅगझीनच्या फ्रंट पेजवर हे फोटोशूट झळकलं. त्यामुळे अनेकांना राग आला आणि या दोघांवर खूप टीका झाली.
यानंतर महेश भट्ट यांनी कॉन्फरन्स घेत 'पूजा त्यांची मुलगी नसती तर त्यांनी तिच्याशी लग्न केलं असतं.' असं वक्तव्य केलं. पुढे जाऊन त्यांनी हे वक्तव्य डिप्रेशनमध्ये केल्याचं स्पष्टीकरण दिलं.