रितेश-जिनिलियाच्या आधी 'हे' अभिनेते होते ‘लालपरी’चे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर

Anushka Tapshalkar

महाराष्ट्राच्या ‘लालपरी’ला मिळणार नवं ग्लॅमर!

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडरपदी निवड झाली आहे.

sakal

एसटीची प्रतिमा होणार अधिक आकर्षक

प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी आणि एसटीची आधुनिक प्रतिमा तयार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

sakal

पाच वर्षांचा करार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लवकरच रितेश-जिनिलियासोबत अधिकृत करार करणार असून हा करार पाच वर्षांसाठी असणार आहे.

sakal

जाहिराती आणि प्रचार मोहिमांमध्ये सहभाग

ही जोडी एसटीच्या जाहिराती, सामाजिक उपक्रम आणि विविध प्रचार मोहिमांमध्ये सक्रियपणे दिसणार आहे.

sakal

याआधी कोण होते ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर?

याआधी अभिनेते मकरंद अनासपुरे आणि दिवंगत विक्रम गोखले यांनी एसटीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून काम पाहिलं होतं.

sakal

नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

रितेश-जिनिलियाच्या लोकप्रियतेचा फायदा घेत एसटी महामंडळ तरुण आणि नव्या प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

sakal

‘राजा शिवाजी’मुळेही चर्चेत देशमुख कुटुंब

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमातून त्यांचा धाकटा मुलगा राहिल देशमुखही सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

sakal

अफजल खानाला ठार मारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे काय केले?

Shivaji Maharaj | esakal
आणखी वाचा