सकाळी रिकाम्या पोटी 'या' झाडाची फक्त 2 पाने खा, मिळतील 5 आश्चर्यकारक फायदे

सकाळ डिजिटल टीम

बेलपत्राचे आरोग्यदायी फायदे

आयुर्वेदात बेलपत्राला औषधी महत्त्व आहे. याचे धार्मिक महत्त्व जसे आहे, तसेच आरोग्यासाठीही ते उपयुक्त मानले जाते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास पचन सुधारते, साखर नियंत्रणात राहते आणि शरीर थंड राहते.

Bel Leaves Benefits | esakal

पचनशक्तीसाठी उत्तम उपाय

बेलपत्रामध्ये भरपूर फायबर आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पोट निरोगी राहते.

Bel Leaves Benefits | esakal

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते

मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेलपत्र उपयुक्त ठरू शकते. यात हायपोग्लायसेमिक गुणधर्म असून ते रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरीत्या कमी करण्यास मदत करतात.

Bel Leaves Benefits | esakal

उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासांपासून संरक्षण

उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढते. बेलपत्राचे सेवन केल्याने शरीर थंड राहते, तसेच उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासांपासून संरक्षण मिळते.

Bel Leaves Benefits | esakal

रोगप्रतिकारशक्ती वाढते

बेलपत्रामध्ये असणारे नैसर्गिक गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि संक्रमणांपासून बचाव करतात.

Bel Leaves Benefits | esakal

हृदयासाठी फायदेशीर

बेलाच्या पानांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्याचे नियमित सेवन कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

Bel Leaves Benefits | esakal

डॉक्टरांचा सल्ला घ्या..

बेलपत्राचे सेवन सुरु करण्याआधी, विशेषतः जर तुम्ही औषधे घेत असाल किंवा एखाद्या आजाराने ग्रस्त असाल, तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Bel Leaves Benefits | esakal

High Protein Fruit : 'हे' फळ अंड्यापेक्षा जास्त प्रथिने देतं; शाकाहारींसाठी आहे वरदान

Guava Benefits High Protein Fruit | esakal
येथे क्लिक करा..