सकाळ डिजिटल टीम
बेलफळ मधुर, पचायला हलके, उष्ण पाचक, गुणकारी व जंतुनाशक असते. बेलफळ पौष्टिक आणि औषधी फळ आहे. हे फळ अनेक आजारांवर गुणकारी आहे.
बेलफळात जीवनसत्व, फायबर आणि पोटॉशियमसारखे पोषक तत्त्वे असतात. या गुणकारी फळाविषयी जाणून घेऊ..
पाणी- ८४ टक्के
प्रथिने- ०.७ टक्के
कार्बोदके- १६.२ टक्के
टॅनिन- ९ ते २० टक्के
साखर -४ ते ६ टक्के
पचन सुधारते, मधुमेह नियंत्रित ठेवते, प्रतिकारशक्ती वाढवते, त्वचा व डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. हृदयविकार व रक्तदाब नियंत्रित ठेवते.
बेलफळ सकाळी रिकाम्या पोटी खावे. भूक उत्तेजित करण्यासाठी जेवणापूर्वी बेलफळाचे सेवन करावे.
पचनाच्या तक्रारी, जुलाब व अजीर्ण, मुरडा यावर बेलफळाचा रस जालीम उपाय आहे. उलट्या, पोटात दुखणे या व्याधीवर गुणकारी आहे. बेलफळ त्रिदोषनाशक, वात, कफ व पित्तनाशक आहे.
- अर्चना ऐनापुरे, निसर्गोपचार तज्ज्ञ