सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्यात ताडगोळा मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो, कारण तो शरीराला थंडावा देतो. हा खाण्यास अगदी नारळ पाण्यासारखा लागतो. याला 'आइस अॅपल' देखील म्हटले जाते.
आपण जाणून घेणार आहोत, की उन्हाळ्यात ताडगोळा खाल्ल्यास शरीराला कोणते फायदे होतात. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊ..
ताडगोळ्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन C, फाइटोन्युट्रिएंट्स, कार्बोहायड्रेट, फायबर, पोटॅशियम आणि सोडियम असे पोषक घटक असतात.
उन्हाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) कमकुवत होते. अशा वेळी इम्युनिटी मजबूत करण्यासाठी ताडगोळ्याचे सेवन फायदेशीर ठरते. यात व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयाच्या समस्या सामान्य झाल्या आहेत. त्यामुळे हृदयाची काळजी घेणे आवश्यक आहे. ताडगोळा हृदयासाठी आरोग्यदायी आहे, कारण तो पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे.
अनेक रिसर्च पेपर्समध्ये हे स्पष्ट झालंय, की ताडगोळ्यात भरपूर कॅल्शियम असते, जे हाडांना मजबूत करण्याचे काम करते. त्यामुळे रोज याचे सेवन केले पाहिजे.
जर तुम्हाला वारंवार पोट बिघडण्याची समस्या असेल, तर त्यासाठी ताडगोळा खाणे उपयुक्त ठरते. यात फायबर असते, जे पचनक्रिया सुधारते आणि पोट व्यवस्थित ठेवते.