Monika Shinde
वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात, पण तरीही पोटावरील चरबी कमी होत नाही.
पोट कमी करण्यासाठी काही सोपे आणि घरच्या घरी करता येणारे उपाय तुम्ही सहज अमलात आणू शकता.
दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून प्या. यामुळे शरीर डिटॉक्स होते आणि पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
दुपारी हलकं, घरचं शिजवलेलं सात्विक जेवण घ्या. भाज्या, चपाती किंवा थोडं भात घ्या, तर तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ व साखर टाळा. अशा आहारामुळे पचन सुधारते आणि पोटावर चरबी साचत नाही.
दिवसातून कमीतकमी ४-५ लिटर पाणी प्यावे. पुरेसे पाणी प्यायल्यामुळे शरीर शुद्ध राहते, मेटाबॉलिजम वाढतो आणि वजन कमी करण्यास मदत होते.
दररोज थोडा तरी व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे चरबी जळते, शरीर तंदुरुस्त राहते आणि पचन सुधारते.
रात्री शक्य असल्यास जेवण टाळा आणि फळं किंवा सॅलड (पपई, काकडी, गाजर) खा. हे पचनाला आराम देते आणि वजन कमी होण्यास मदत करते.
रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास पाण्यात एक चमचा जीरं टाकून उकळवा. नंतर पाणी गाळून गरम गरम प्या. जीरं पचन सुधारते, मेटाबॉलिजम वाढवते आणि पोटातील फुगवटा कमी करतो.