Anushka Tapshalkar
दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला वट पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा हा सण 10 जून रोजी साजरा केला जाणार आहे.
वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा केली जाते कारण याच्या पारंब्यांखाली सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, अशी पुराणात कथा आहे.
वडाच्या झाडावर ब्रह्मदेवाचा वास मानला जातो. त्यामुळे सुहासिनी स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी याची पूजा करतात.
वडाला ‘यज्ञीय वृक्ष’ म्हटलं जातं कारण यज्ञात वापरली जाणारी भांडी याच लाकडापासून बनवली जात.
वडाच्या पानांवर तूप-तेल गरम करून सुजलेल्या किंवा दुखत असलेल्या जागी लावल्याने आराम मिळतो.
वडाच्या पारंब्यांचा काढा शक्तीवर्धक मानला जातो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
वडाची फळे बुद्धी वाढवणारी मानली जातात. त्यामुळे ती आयुर्वेदात उपयोगी ठरतात.
वडाचे झाड मोठं, दाट सावली देणारं असतं. रस्त्याच्या कडेला छाया मिळावी म्हणून ते लावलं जातं.
वड झाड जरी उंच असलं, तरी त्याच्या पारंब्या झुकलेल्या असतात. यातून विनम्र राहण्याचा संदेश मिळतो.