सकाळ डिजिटल टीम
डार्क चॉकलेटचे चवीला जरी कडू असले तरी त्याचे आनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे खाल्यास आरोग्यास कोण-कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.
Dark chocolate
sakal
डार्क चॉकलेटमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉलसारखे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील पेशींना नुकसान करणाऱ्या फ्री-रॅडिकल्सपासून वाचवतात.
Dark chocolate
sakal
नियमित डार्क चॉकलेट खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते. यामुळे हृदयाशी संबंधित आजार, जसे की हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
Dark chocolate
sakal
यात असलेले घटक शरीरातील 'बॅड' कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करतात आणि 'गुड' कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्यास मदत करतात.
Dark chocolate
sakal
डार्क चॉकलेट मेंदूतील रक्ताचा प्रवाह वाढवण्यास मदत करते. यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारू शकते. तसेच, यामुळे अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या रोगांचा धोका कमी होतो.
Dark chocolate
sakal
डार्क चॉकलेट खाल्ल्याने सेरोटोनिन आणि एंडोर्फिनसारखे हार्मोन्स तयार होतात, जे मूड सुधारतात आणि तणाव कमी करण्यास मदत करतात.
Dark chocolate
sakal
कोकोमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स इन्सुलिन संवेदनशीलता (Insulin Sensitivity) सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
Dark chocolate
sakal
चांगल्या प्रतीच्या डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात लोह, मॅग्नेशियम, तांबे आणि फायबरसारखी पोषक तत्वे आढळतात.
Dark chocolate
sakal
डार्क चॉकलेटचा फायदा घेण्यासाठी, कमीतकमी ७०% कोको असलेले आणि कमी साखर असलेले चॉकलेट निवडणे महत्त्वाचे असते.
Dark chocolate
sakal
Who Should Avoid Apples
esakal