सकाळ डिजिटल टीम
नारळाचे पाणी म्हणजेच शहाळ्याचे पाणी शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पाणी पचनाचं आणि हृदयाचं आरोग्य सुधारण्यात मदत करते.
नारळाचे पाणी शरीरातील पाणी कमी झाल्यावर त्वरित हायड्रेट करण्यासाठी उत्तम आहे. विशेषत: उन्हाळ्यात, परंतु नारळाचे पाणी प्रत्येक सीझनमध्ये फायद्याचे आहे.
अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C आणि E असतात, जे फायदेशीर आहेत.
नारळ पाणी पिण्याने किडनी स्टोनपासून वाचता येते. त्याच्या नियमित सेवनाने यूरीनचे प्रमाण वाढते आणि किडनीमध्ये स्टोन तयार होणारे खनिज कमी होतात.
नारळ पाण्यात असलेले फायबर आणि एंजाईम पचन सुधारण्यास मदत करतात.
नारळ पाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नीशियम असतात. हे इलेक्ट्रोलाइट्स शरीरात द्रव संतुलन राखण्यास मदत करतात.
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी नारळ पाणी अत्यंत फायदेशीर आहे. हाय पोटॅशियमच्या गुणधर्मामुळे सोडियमचा प्रभाव कमी होतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.