Anushka Tapshalkar
प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात मसाला म्हणून वापरले जाणारे जिरे फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर अनेक पोषक तत्वांनी देखील समृद्ध आहे.
जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन्स A, B6, C, E, K, नियासिन, रिबोफ्लेविन आणि थायामिन असतात. याशिवाय यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मँगनीज आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात.
या पोषणमूल्यांमुळे जिऱ्याचे पाणी सेवन करणे भरपूर फायदेशीर ठरू शकते. जिऱ्याचे पाणी पिल्याने फक्त चरबीच घटत नाही तर त्याचे बरेच आरोग्यदायी फायदे देखील आहेत.
जिऱ्यात उपलब्ध असलेले कमपाउंड्स पचनासाठी उत्तम असतात. त्यामुळे जिऱ्याचे पाणी रोज प्यायल्याने पचन संस्थेचे आरोग्य सुधारू शकते.
जिऱ्यात फायबर असते ज्यामुळे त्याचे सेवन केल्याने पोट जास्त काळासाठी भरलेले राहते. यामुळे आवश्यक खाणे टळते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
जिरे आपल्या शरीराचे मेटाबोलिजम सुधारते , ज्यामुळे शरीरावरची एक्सट्रा चरबी कमी करण्यास मदत होते.
जिऱ्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील इंफ्लेमेशन कमी करतात. यामुळे बऱ्याच आजरांचा धोका कमी होतो.
जिऱ्याचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल पातळी आटोक्यात राहते.
जिऱ्याचे रोज सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्तीला चालना मिळते.
जिरे व्हिटॅमिन ई सारख्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे जे अकाली वृद्धत्वास कारणीभूत फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते. याव्यतिरिक्त यामुळे त्वचा टाईटही राहते.
जिऱ्याचे पाणी पिण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी रिकाम्या पोटी आहे. कारण यामुळे आपल्या शरीराला पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत होते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.