सकाळ डिजिटल टीम
मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला विशेष महत्त्व आहे. साधारणपणे तिळ उष्ण मानला जातो, संक्रांत ही थंड वातावरणात येते म्हणून जास्त महत्त्व आहे.
मकर संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रात तिळ व गुळ वापरून विविध पदार्थ बनवले जातात.तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, आणि तीळ-गुळाची पोळी हे पारंपारिक पदार्थ बनवली जातात.
ह्या दिवशी तिळ व गुळ यांचा नैवेद्य बनवला जातो, जो एक गोड आणि पौष्टिक पदार्थ आहे. या पदार्थांचा सेवन केल्याने शारीरिक आरोग्य सुधरते आणि उष्णतेपासून संरक्षण मिळते.
तिळ व गुळ एकत्र देऊन माणसाच्या मनातील क्रोध, लोभ आणि भांडण विसरून नव्या वर्षाला सुरवात करतात.
'तीळगुळ घ्या, गोड बोला' असे म्हणत लोक एकमेकांना तिळ-गुळ देवून गोड बोलण्याचे सांगतात.
मकर संक्रांतीचा दिवस एकमेकांशी गोड बोलून, कटुता विसरून मैत्री करण्याचा दिवस असतो.
तिळ आणि गुळ या दोन्ही पदार्थांना संक्रांतीच्या दिवशी अत्यधिक पारंपरिक महत्त्व आहे. पदार्थ केवळ स्वादिष्ट नसून, त्यांचे आरोग्यदायक फायदे देखील आहेत.