Saisimran Ghashi
लिंबू पाणी अनेकजण आवडीने पितात, पण त्यात ओवा घालून पिण्याचे जास्त फायदे आहेत.
रोज एक कप लिंबू पाण्यात ओवा खालून प्यायल्यास पचनाच्या समस्या दूर होतात.
ओवा आणि लिंबू पाण्याने मूतखड्याचा त्रास कमी होतो.
हे पाणी प्यायल्याने पोटात गॅस होणे, पोट फुगणे ही समस्या देखील पूर्णपणे कमी होते.
लिंबू पाणी आणि ओवा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
तुमच्या पोटावर चरबी झाली असल्यास ती कमी होऊन वजन नियंत्रणात येते.
मासिक पाळीच्या दिवसांत पोट दुखत असल्यास ओवा घातलेल्या लिंबू पाण्याने त्रास कमी होतो.
ऍसिडिटी, जळजळ होणे या समस्यादेखील हे पाणी प्यायल्यास कमी होतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.