सकाळ डिजिटल टीम
रोज झोपण्याआधी जायफळ दूध पिण्याचे आनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
तुम्हाला जर रात्री शांत झोप लागत नसेल तर झोपण्यापुर्वी जायफळ घातलेले दूध का प्यावे जाणून घ्या.
जायफळात 'मायरेस्टिसिन' नावाचे तत्व असते, ज्यामुळे मेंदू शांत होतो आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.
जायफळ आणि दूध एकत्रितपणे सेवन केल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत राहते.
जायफळ पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.
जायफळात कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम सारखे घटक असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
जायफळात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात आणि त्वचा चमक देण्यास मदत करतात.
एक ग्लास कोमट दुधात एक चमचा जायफळ पूड टाका त्यानंतर ते चांगले मिक्स करून तुम्ही हे झोपण्यापूर्वी पिऊ शकतात
जास्त प्रमाणात जायफळ खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.