Saisimran Ghashi
आपल्या देशात खाऊची पाने खाण्याची प्रथा शतकानुशतके जुनी आहे.
पण तुम्हाला माहिती आहे काय याच खाऊच्या पांनाच्या धार्मिक महत्वासह अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत.
खाऊच्या पानांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, कॅरोटीन, रिबोफ्लेविन, नियासिन, अँटी-ऑक्सिडंट्स, प्रथिने आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
खाऊच्या पानांमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळते. यामुळे ते रोज झोपताना ते खाल्ल्यास चांगली झोप येते आणि सकाळी पोटही साफ राहते.
कोरडा खोकला आणि कफ असलेल्या लोकांनी खाऊचे पान मधासोबत खाल्यास घशाच्या समस्या दूर होतात.
खाऊच्या पानांचे योग्य सेवन केल्यास पोटात असलेले युजेनॉल शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल देखील काढून टाकते.
ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही यांची पुष्टी करत नाही. आरोग्यासंबंधित समस्या असल्यास डॉक्टरांना भेटा.