सकाळ डिजिटल टीम
रोज एक उकडलेला बटाट्याचे सेवन केल्यास आरोग्यास अनेक प्रकारचे फायदे मिळतात.
कडलेला बटाट्याचे सेवन केल्यास आरोग्यास कोण-कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.
उकडलेल्या बटाट्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या टाळता येते.
बटाट्यातील पोटॅशियम उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि शरीराला संक्रमणांपासून वाचवण्यास मदत करताता.
उकडलेल्या बटाट्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी फायदेशीर असतात. ते त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात.
बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असल्याने ते शरीराला ऊर्जा देतात.
बटाट्यामध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
तुम्ही उकडलेले बटाटे आहारात नियमितपणे समाविष्ट करू शकता. मात्र, त्यांचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे.