संतोष कानडे
आरोग्याच्या दृष्टीने वरदान असलेल्या चुन्याकडे आपण मात्र कानाडोळा करतो. तंबाखूसोबत मळला जातो म्हणून चुना बदनाम आहे.
चुन्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, त्यामुळे हाडांचे दुखणे, मणक्याच्या विकारांमध्ये फायदेशीर ठरतो. शिवाय हाडं ठिसूळ होण्यापासून वाचतात.
चुना रोज किती खावा? तर एका गव्हाच्या दाण्याइतका पुरेसा आहे. यामुळे लहान मुलांची उंची आणि स्मरणशक्ती वाढते.
दारांच्या आरोग्यासाठी चुना फायदेशीर मानला जातो. हिरड्यांमधून रक्त येणं यामुळे थांबू शकतं.
सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी.. जिथे जिथे हाडांशी संबंधित आजार आहेत, तिथे चुना गुणकारी आहे.
चुना मर्यादित प्रमाणाताच सेवन केला पाहिजे. चुना पचनक्रियेतही फायदेशीर ठरतो. काविळसारख्या आजारात गुणकारी ठरतो.
ज्यांना किडनी स्टोन अथवा पित्ताशयातील खड्याच्या त्रास आहे त्यांनी चुन्याचं सेवन करु नये, नाहीतर खडा मोठा होतो.
चुना हा दही, डाळ, ताक किंवा पाण्यासोबत घ्यावा. तंबाखूसोबत जो चुना खाल्ला जातो तो मात्र अत्यंत घातक आहे.