संतोष कानडे
ताडोबातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणलेल्या तारा वाघिणीने चक्क दीड किलोमीटर पोहून प्रवास केला आहे.
विशेष म्हणजे चांदोलीच्या धरणात जिथे मगरींचा अधिवास आहे, तिथून ही वाघीण झोळंबीत पोहोचली.
या वाघिणीचं नाव तारा असून ती दोन वर्षांची आहे. सह्याद्रीत पोहोचल्यानंतर पिंजऱ्याचं दार उघडूनही सहा दिवसांनंतर ती बाहेर पडली.
१८ डिसेंबर रोजी ताराने सोनार्लीचे पठार गाठले. तिथेच दिवसभर बसून राहिली. १९ तारखेला खाली पठारावरुन खाली उतरली.
ताराने चांदोली धरणाचं पाणलोटक्षेत्र गाठलं. दिवसभर तिथेच बसून राहिल्यानंतर तिने पाण्याच्या पलीकडच्या भागाचा अंदाज घेतला.
सायंकाळी सहा वाजता तिने पाण्यात उडी घेतली आणि पोहू लागली. दीड तास पोहून ती झोळंबीच्या भागात पोहोचली.
वन विभागाचा चमू तिच्या गळ्यातील जीपीएसद्वारे तिच्यावर लक्ष ठेऊन होता. ज्या भागात मगरी आहेत, तिथून तिने सुखरुप प्रवास केला.
तारा वाघीण आता आपली स्वतःची हद्द तयार करण्याच्या विचारात असू शकते.
डॉगी पॅडल पद्धतीने वाघ पाण्यात पोहू शकतात. त्यांच्या पायांच्या बोटांमध्ये जाळीसारखी काडी असते. त्यामुळे ते सहज पोहतात.