Saisimran Ghashi
रात्री जेवणानंतर आपण शक्यतो आइसक्रीम किंवा मुखवास खातो
पण तुम्हाला माहितीये रात्री झोपण्यापूर्वी एक फळ खाल्ल्यास 5 फायदे मिळतात
काही फळांमध्ये नैसर्गिक मेलाटोनिन आणि मॅग्नेशियम असते, जे शरीराला आराम देऊन झोपेस मदत करतात.
फायबरयुक्त फळे (जसे की सफरचंद, पपई) रात्री खाल्ल्यास पचन सुधारते आणि सकाळी सहजतेने शौच होते.
कमी कॅलरी आणि जास्त पोषणमूल्य असलेली फळे रात्री खाल्ल्यास रात्रीचे अति खाणे टाळता येते आणि वजन नियंत्रित राहते.
अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांनी भरलेली फळे (जसे की कीवी, बेरी) त्वचेचे पोषण करून नैसर्गिक ग्लो देतात
फळांमध्ये असणारे नैसर्गिक शुगर, ट्रिप्टोफॅन, आणि अँटीऑक्सिडंट्स मेंदूला शांत ठेवतात, ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.