फक्त 5 मिनिटं पुरेशी! थकवा अन् स्ट्रेस दूर करणारा घरगुती उपाय

Aarti Badade

तळपायांकडे दुर्लक्ष नको!

आपल्या शरीराच्या अनेक महत्त्वाच्या नसांचा शेवट तळपायात असतो. त्यामुळे पायांची काळजी घेतल्यास संपूर्ण शरीर निरोगी राहते.

Hot water foot soak benefits

|

Sakal

कसा करायचा हा उपाय?

एका पसरट टबमध्ये तुम्हाला सहन होईल इतपत गरम पाणी घ्या. त्यात १० ते १५ मिनिटे पाय बुडवून शांत बसा. हा साधा उपाय तुमच्या आरोग्यासाठी 'मॅजिक' सारखा काम करतो.

Hot water foot soak benefits

|

Sakal

नॅचरल बॉडी डिटॉक्स

गरम पाण्यात पाय बुडवल्याने शरीरातील लिम्फॅटीक सिस्टिम सक्रिय होते. ही यंत्रणा शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर काढून शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ करण्यास मदत करते.

Hot water foot soak benefits

|

Sakal

एप्सम सॉल्टची जादू

जर तुम्ही गरम पाण्यात अर्धी वाटी एप्सम सॉल्ट घातले, तर शरीराला भरपूर मॅग्नेशियम मिळते. यामुळे हातापायांची सूज कमी होते आणि स्नायूंना आराम मिळतो.

Hot water foot soak benefits

|

Sakal

स्ट्रेस आणि थकवा

दिवसभराच्या कामाचा प्रचंड थकवा आणि मानसिक ताण असेल, तर हा उपाय सर्वोत्तम आहे. गरम पाण्यामुळे नसा रिलॅक्स होतात, ज्यामुळे ताण ५ मिनिटांत कमी झाल्याचे जाणवते.

Hot water foot soak benefits

|

sakal

मिळेल शांत झोप!

ज्यांना रात्री लवकर झोप येत नाही, त्यांनी झोपण्यापूर्वी हा प्रयोग नक्की करावा. मन आणि शरीर शांत झाल्यामुळे तुम्हाला लहान मुलांसारखी गाढ आणि शांत झोप लागते.

Hot water foot soak benefits

|

Sakal

व्हिनेगर

पाण्यात थोडे व्हिनेगर घातल्यास पायांच्या त्वचेची पीएच (pH) लेव्हल संतुलित राहते. यामुळे पायांना येणारी दुर्गंधी कमी होते आणि त्वचा मऊ व स्वच्छ होते.

Hot water foot soak benefits

|

Sakal

आनंदाचा मंत्र!

स्वतःसाठी फक्त १५ मिनिटे काढा. हा उपाय केवळ शारीरिक वेदनाच कमी करत नाही, तर तुम्हाला मानसिकरित्या प्रसन्न आणि आनंदी ठेवण्यास मदत करतो. आजच करून पहा!

Hot water foot soak benefits

|

Sakal

सांधेदुखी साधी नाही! 'या' गंभीर आजाराचा इशारा देते

Shoulder pain and heart attack link

|

sakal

येथे क्लिक करा