Aarti Badade
हात, खांदे किंवा गुडघे दुखणे आपण अनेकदा कामाचा ताण समजून दुर्लक्ष करतो. साधी वाटणारी वेदना शरीरातील एखाद्या मोठ्या आजाराचा इशारा असू शकते.
Shoulder pain and heart attack link
Sakal
जर तुमच्या डाव्या हातात आणि खांद्यामध्ये सतत वेदना होत असतील, तर सावध व्हा. कधीकधी हृदयाशी संबंधित समस्यांमुळे डाव्या बाजूला वेदना जाणवतात. या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
Shoulder pain and heart attack link
Sakal
आजकाल लॅपटॉप आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे मानेच्या मज्जातंतूंवर दबाव येतो. यामुळे होणारी वेदना मान सोडून खांदे आणि हातांपर्यंत पसरते. यालाच 'सर्वाइकल स्पॉन्डिलायटीस' म्हणतात.
Shoulder pain and heart attack link
Sakal
खांद्याची हालचाल करताना तीव्र वेदना होत असतील आणि खांदा ताठरला असेल, तर हे 'फ्रोजन शोल्डर'चे लक्षण असू शकते. यामध्ये खांद्याची हालचाल मर्यादित होते आणि वेदना वाढत जातात.
Shoulder pain and heart attack link
Sakal
शरीरात कॅल्शियम, व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यास हाडे आणि सांधे कमकुवत होतात. यामुळे सांध्यांमध्ये घर्षण वाढून सूज आणि सतत वेदना जाणवू लागतात.
Shoulder pain and heart attack link
Sakal
वाढलेले वजन सांधेदुखीचे मोठे कारण आहे. अतिरिक्त वजनामुळे गुडघे, कंबर आणि पायांच्या सांध्यांवर जास्त ताण येतो, ज्यामुळे तरुण वयातच सांधे झिजू लागतात.
Shoulder pain and heart attack link
Sakal
हातापायांना मुंग्या येणे किंवा बधीरपणा जाणवणे.सांध्यांच्या ठिकाणी सूज येणे किंवा ते भाग लाल होणे.हालचाल करताना हाडांमधून आवाज येणे.सतत चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे.
Shoulder pain and heart attack link
Sakal
पेनकिलर्सवर अवलंबून राहण्याऐवजी, जर वेदना २-३ दिवसांपेक्षा जास्त टिकत असतील, तर त्वरित अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वेळेवर निदान झाल्यास गंभीर शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते.
Shoulder pain and heart attack link
Sakal
Benefits of turmeric water
Sakal