Sandeep Shirguppe
दुधाचे आपल्या आहारात अनन्य साधारण महत्व आहे. त्याबरोबर दुधापासून बनलेले दही, तूप, लोणी, सायही उपयुक्त असते.
दुधाची साय आपल्या शरिराला अधिक गुणकारी मानली जाते. यामध्ये गुड फॅट्सचे प्रमाण अधिक असते.
सायीमध्ये ए, डी आणि ई जीवनसत्त्वे असतात. हाडे मजबूत करतात.
कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे घटक सायमध्ये असतात.
चेहऱ्यावर लावण्यासोबतच साय खाल्ल्याने त्वचेला अनेक फायदे होतात.
साय खाल्ल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
साय नियमितपणे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि हाडांची घनता सुधारते.
मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यासाठी पेशींची रचना आणि कार्य करण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी साय फायदेशीर आहे.