Sandeep Shirguppe
गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण गुळापेक्षाही अधिक पौष्टीक काकवी असल्याचे बोलले जाते.
उसाचा रस गरम केल्यावर गूळ बनण्यापूर्वी एक द्रव तयार होतो. ज्याला काकवी म्हणतात.
काकवी केवळ गुऱ्हाळ घरातच मिळते. ती वर्षभर पॅक करून साठवता येते.
कावीळ झाली असेल तर काकवी खाणे हा एक बेस्ट पर्याय आहे.
आयुर्वेदात काकवीचे फायदे आणि गुणधर्माशी संबंधित अनन्य साधारण महत्व आहे.
काकवी पचायला हलकी असते. त्यामुळे शरीरात ताकद निर्माण होण्यास मदत होते.
काकवीत कॅल्शियम भरपूर असल्याने हाडे मजबूत करण्यास फायदा होतो.
रक्त शुद्ध करण्यास काकवीची फायदेशिर आहे. शरीराचा थकवा दूर करून ऍनर्जी वाढवते.