सकाळ डिजिटल टीम
हवामानात होणारे सततचे बदल शरीरावर विपरीत परिणाम करतात. या काळात सर्दी, खोकला, ताप यांसारखे विषाणूजन्य आजार पटकन होतात.
पण, निसर्गातच काही उपाय लपलेले असतात, त्यापैकीच एक म्हणजे पपईची पाने! योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे याचे सेवन केल्यास, ते तुमच्या रोगप्रतिकारशक्तीला बळकट करण्याचे काम करते.
पपईच्या पानांमध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-ऑक्सिडंट घटक असतात, जे बदलत्या हवामानात होणाऱ्या सर्दी व खोकल्यापासून संरक्षण देतात.
या पानांमध्ये व्हिटॅमिन A, C, E आणि K असते, जे शरीराला रोगांशी लढण्यास मदत करते. दररोजच्या सेवनामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती बळकट होते.
पपईच्या पानांमध्ये असणारे एन्झाइम्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. यामुळे पोट साफ राहते आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.
पपईची पाने रस म्हणून घेता येतात. त्यासाठी काही ताजी पाने घ्या, पाण्यासोबत मिक्सरमध्ये वाटा आणि कपड्याने गाळून ते रस स्वरूपात प्या. दररोज सकाळी एक चमचा रस घेतल्यास अधिक फायदेशीर ठरते.
पपईची पाने काहींना जडही जाऊ शकतात. त्यामुळे सुरुवात करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.