पोटाची चरबी झपाट्याने कमी करायचीये? आहारात 'या' 4 गोष्टींचा आजपासूनच समावेश करा!

सकाळ डिजिटल टीम

पोटाची चरबी कमी करायचीये?

आजकाल अनेक लोक वाढत्या वजनामुळे आणि पोटावरील चरबीमुळे त्रस्त आहेत. यामुळे केवळ व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत नाही, तर आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो.

Belly Fat Reduction, Weight Loss Foods | esakal

पोटाची चरबी कमी करता येते

पण, योग्य आहार आणि थोडा व्यायाम केल्यास पोटाची चरबी सहज कमी करता येते. चला पाहूया, कोणत्या ४ गोष्टी तुमच्या आहारात आजपासूनच समाविष्ट करायला हव्यात :

Belly Fat Reduction, Weight Loss Foods | esakal

हिरव्या पालेभाज्या खा

ब्रोकोली, मेथी, पालक यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. या भाज्या पचन सुधारतात आणि चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात.

Belly Fat Reduction, Weight Loss Foods | esakal

चिया बियांमध्ये भरपूर फायबर

चिया बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि भरपूर फायबर असते. हे बियाणे पाण्यात भिजवून सेवन केल्यास दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे अधिक खाणं टळतं.

Belly Fat Reduction, Weight Loss Foods | esakal

ओट्स - साखर नियंत्रणात ठेवते

ओट्समध्ये सोल्युबल फायबर भरपूर प्रमाणात असतं, जे पोटातील चरबी कमी करण्यात मदत करतं. याशिवाय, ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतं.

Belly Fat Reduction, Weight Loss Foods | esakal

दालचिनी - चयापचय वाढवण्यासाठी उपयुक्त

दालचिनीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म (चयापचय) वाढतो. हे चरबी जाळण्याची प्रक्रिया गतीमान करते. सकाळी कोमट पाण्यात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून घ्या.

Belly Fat Reduction, Weight Loss Foods | esakal

व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

केवळ आहारावर लक्ष देणं पुरेसं नाही. दररोज १०-३० मिनिटांचा व्यायाम चरबी कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच, कोणत्याही आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Belly Fat Reduction, Weight Loss Foods | esakal

चरबी जाळण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत..; पुरुषांसाठी वरदान आहे 'हिंग'

Asafoetida Hing Benefits for Men | esakal
येथे क्लिक करा..