सकाळ डिजिटल टीम
पिवळ्या रंगाच्या केळाबरोबरच लाल रंगाचं केळही बाजारात मिळतं, ते आरोग्यासाठी 'अमृत' मानलं जातं.
केळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. कारण लाल केळामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन-C, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे घटक असतात.
लाल केळ खाल्ल्याने पाचनक्रियेत सुधारणा होते. कारण, यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचन तंत्र व्यवस्थित ठेवते.
लाल केळ खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. कारण, यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण भरपूर असते, जे शरीराला ऊर्जा प्रदान करते.
लाल केळ खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते. यामध्ये व्हिटॅमिन-C आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेसाठी उपयुक्त ठरतात.
लाल केळ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) वाढते. याचे कारण म्हणजे, यामध्ये व्हिटॅमिन-C आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे प्रतिकारशक्ती वाढवतात.
लाल केळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. कारण, यामध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.