Pranali Kodre
भारतात बऱ्याच ठिकणी उपवास सोडताना पहिला घास हा भाताचाच खाल्ला जातो.
उपवासानंतर भात खाण्याची परंपराही आहारशास्त्र, आयुर्वेदाशी जोडलेली आहे.
दिवसभर उपवास केल्याने आपली पचनक्रिया मंदावलेली असते. अशावेळी भात हा हलका, मऊ आणि सहज पचणारा पदार्थ असतो.
भात (विशेषत:तांदळाचा) पोटाला फार त्रास न देता त्वरित ऊर्जा मिळून देतो. कारण भातात कार्बोहायड्रेट जास्त असतात.
याशिवाय पोट रिकामं असताना मसालेदार, जड पदार्थ खाल्ल्याने आम्लपित्त वाढू शकते, पण रिकाम्या पोटी भात खाल्याने हा त्रास होण्याती शक्यता कमी होते.
आयुर्वेदातही उपवासानंतर मधुर रस व लघू आहार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, भातात हे दोन्ही गुणधर्म मिळतात.
याशिवाय भारतात तांदळाला समृद्धी आणि शुभ प्रतिक मानले जाते. त्यामुळे उपवासानंतर भात खाणे हा शुद्धतेचा आणि परंपरेचा भागही मानला जातो.