सकाळ डिजिटल टीम
आजकाल फिटनेसबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. लोक यासाठी खूप मेहनतही करत आहेत.
अनेक फिटनेस अॅप्स आणि तज्ज्ञ दररोज १०,००० पावले चालण्याचा सल्ला देतात. यामागे काय लॉजिक आहे हे जाणून घेऊ..
अनेक अभ्यासातून असं समोर आलंय, की अधिक चालण्यामुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असतो.
दररोज चालण्यामुळे हृदयविकारांशी संबंधित आजारांची शक्यताही कमी होते.
पायी चालण्यामुळे मेटाबॉलिझम (चयापचय प्रक्रिया) मजबूत होते. जे लोक दररोज ७,५०० ते १०,००० पावले चालतात, त्यांची शरीराची हालचाल व चपळता अधिक चांगली असते.
जे लोक नेहमी चिडचिडे वाटतात, अशा लोकांनी जर रोज चालण्याची सवय लावली तर त्यांच्यात सकारात्मक बदल दिसून येतो.