Anushka Tapshalkar
एकेकाळी हाफ पँट लहान मुलांची मानली जायची, पण आज सर्व वयोगटातील लोक, अगदी महिला देखील, बर्म्युडा शॉर्ट्स घालतात. हा केवळ आरामदायी पोशाख न राहता आता ‘फॅशन स्टेटमेंट’ बनला आहे!
बर्म्युडा शॉर्ट्सचा जन्म २०व्या शतकात ब्रिटिश सैन्यासाठी झाला. दमट हवामानात सोयीस्कर पोशाख म्हणून याची संकल्पना आली.
बर्म्युडातील एका चहाच्या हॉटेलमध्ये कर्मचार्यांना उष्णतेपासून आराम मिळावा म्हणून मालकाने त्यांच्या फुल पँट्स गुडघ्यापासून कापल्या.
बर्म्युडा शॉर्ट्स लष्करात रुजल्यावर सामान्य लोकांनाही आकर्षित करू लागले. १९२०च्या दशकात बँक कर्मचारी आणि हॉटेलमध्ये काम करणारेही त्याचा वापर करू लागले.
सुरुवातीला केवळ समुद्रकिनारी वापरण्यात येणाऱ्या शॉर्ट्सचा प्रवेश रस्त्यावर आणि ऑफिसमध्येही झाला.
१९५०च्या दशकात महिलांनाही बर्म्युडा शॉर्ट्स घालण्याची परवानगी मिळाली. पूर्वी गुडघ्यापर्यंत पाय दाखवणे निषिद्ध मानले जात होते.
Dior, Armani, Ralph Lauren यांसारख्या ब्रँड्सनी बर्म्युडा शॉर्ट्सना फॅशनच्या मुख्य प्रवाहात आणले.
हॉलिवूड सेलिब्रिटींनी बर्म्युडा शॉर्ट्सला स्टायलिश बनवले. २०१४ ऑस्कर सोहळ्यात प्रसिद्ध संगीतकार फॅरल यांनी ते परिधान केले होते.
बर्म्युडा शॉर्ट्स आता स्टायलिश, आरामदायी आणि विविध रंगसंगतीत उपलब्ध आहेत. ते केवळ समुद्रकिनाऱ्यासाठी नव्हे तर ऑफिस आणि पार्टीसाठीही लोकप्रिय झाले आहेत!