संतोष कानडे
उत्तर अटलांटिक महासागरात असा एक त्रिकोणी भाग आहे जिथे कित्येक जहाजं आणि विमानं गायब झाले आहेत. या सैतानाच्या त्रिकोणाचे रहस्य आजही उलगडलेले नाही.
१९१८ मध्ये अमेरिकेचे यूएसएस सायक्लॉप्स नावाचे अजस्त्र मालवाहू जहाज ३०६ प्रवाशांसह गायब झाले. एवढ्या मोठ्या विमानाचा एक तुकडादेखील सापडला नाही.
५ डिसेंबर १९४५ रोजी अमेरिकन नौदलाचे एव्हेंजर टॉरपीडो विमान उडालं आणि याच ट्रँगलवरुन गायब झालं.
त्यानंतर गेलेले बचाव पथकाचे विमानही बेपत्ता झाले. या विमानाचे अवशेष किंवा त्यातल्या १४ जणांचा आजही शोध लागलेला नाही.
या भागात विमान किंवा बोट जाताच त्यांचं होकायंत्र वेड्यासारखं फिरतं. येथे विशिष्ट चुंबकीय विसंगती आहे.
महत्त्वाचं म्हणजे १४९२ मध्ये ख्रिस्तोफर कोलंबसने या भागातून प्रवास करताना आकाशात विचित्र प्रकाश दिसल्याचा आणि होकायंत्राने दिशा बदलल्याचा उल्लेख केला होता.
ब्रूस गर्नन नावाच्या एका वैमानिकाला त्याच्या विमानाभोवती एक पांढरा बोगदा तयार झाल्याचं दिसलं. त्यातून तो बाहेर पडला तेव्हा अवघ्या ३० मिनिटात त्याने ७५ मिनिटांचा पल्ला गाठला होता.
या बर्मुडा ट्रँगलबाबत वैज्ञानिकांनी अनेक सिद्धांत मांडले, मात्र कुठलाही एक सिद्धांत सर्व घटनांची उत्तरं देऊ शकला नाही.
वैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार, समुद्राच्या तळाशी मिथेन गॅसचे साठे आहेत. हा गॅस अचानक बाहेर येतो आणि पाण्याचे घनत्व कमी होते. त्यामुळे जहाचे क्षणात बुडतात.
याशिवाय या त्रिकोणावर तयार होणाऱ्या सहा कोनी ढग एअर बॉम्बसारखं काम करतात. त्यांचा वेग १७० किमी असतो. त्यामुळे विमानं हवेतच नष्ट होतात. मात्र हे सिद्धांत मान्य झालेले नाहीत.