आयुष्य बदलून टाकणारी भारतातली ९ ठिकाणं

संतोष कानडे

हम्पी

कर्नाटकात असलेलं हे ऐतिहासिक स्थान. आजही इथे विजयनगर साम्राज्याचे अवशेष दिसतात. हे जग नश्वर असल्याची जाणीव होते.

तामिळनाडू

कन्याकुमारी कुणाला माहिती नाही? इथे तीन समुद्रांचा संगम पाहताना आयुष्याच्या सुरुवात–शेवटीचा अर्थ नव्याने उमजतो.

स्पीती व्हॅली

हिमाचल प्रदेशात असलेलं हे ठिकाण. निर्जन डोंगर, बौद्ध मठ आणि शांत वातावरणामुळे स्वतःशी संवाद साधायला पोषक वातावरण

माजुली

आसाममध्ये माजुली आहे. जगातील सर्वात मोठं नदीवरील बेट, जिथे साधेपणा आणि सांस्कृतिक जाणीव होते. यामुळे मनाला शांती प्राप्त होते.

लडाख, जम्मू-काश्मीर

हिमालयाच्या कुशीत वसलेला लडाख शांतता, ध्यान आणि साध्या जीवनाची खरी किंमत शिकवतो. त्यामुळे इथं जाणं आवश्यक आहे.

वाराणसी, उत्तर प्रदेश

गंगेच्या काठावर वसलेलं जगातलं सर्वात प्राचीन शहर असून जीवन–मृत्यूचा अर्थ या ठिकाणामुळे उलगडू शकतो.

अंदमान–निकोबार

शांत समुद्र, शुद्ध वातावरण आणि डिजिटल जगापासून खूप दूर नेणारा हा प्रवास. हा अनुभव तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो.

अरुणाचल प्रदेश

भारताच्या पूर्व टोकावर वसलेला हा प्रदेश अध्यात्म आणि निसर्गाचा अनोखा संगम आहे.

ऋषिकेश

उत्तराखंड येथे असलेल्या ऋषिकेशमध्ये योग, ध्यान करता येईल. तसेच गंगेचं पावित्र्य मन शांत करत जीवनाकडे पाहण्याची दिशा बदलतं.

नग्नतेला कायदेशीर मान्यता असलेलं शहर

<strong>येथे क्लिक करा</strong>