संतोष कानडे
बर्मुडा ट्रँगल हा अटलांटिक महासागरातील मायामी, बर्मुडा आणि प्युर्टो रिको यांच्यामधील काल्पनिक त्रिकोण आहे.
या त्रिकोणात अनेक जहाजं आणि विमाने अचानक गायब झाल्याच्या कथा वर्षानुवर्षे सांगितल्या जातात.
काही विमाने रडारवरून अचानक गायब झाल्याच्या घटनांमुळे बर्मुडा ट्रँगल जगातील सर्वात रहस्यमय समुद्री भाग म्हणून ओळखला जातो.
काही बचावलेल्या प्रवाशांनी सांगितलं की, बर्मुडा ट्रँगलमध्ये वेळेचा अंदाज चुकतो, त्यामुळेच टाइम ट्रॅव्हलची चर्चा सुरू झाली.
टाइम वॉर्प थिअरीनुसार या भागात वेळेचा प्रवाह सामान्य नसून तो असामान्य आहे. मात्र याला आजपर्यंत वैज्ञानिक पुरावा नाही
काही लोक बर्मुडा ट्रँगलमध्ये नैसर्गिक वर्महोल तयार होतो किंवा एलियन शक्ती यामागे कारणीभूत आहेत असा दावा करतात.
वादळं, शक्तिशाली समुद्री प्रवाह, हवामानातील वेगाने होणारे बदल आणि मानवी चूक यामुळे विमान किंवा जहाज अपघातग्रस्त होतं, असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.
भूतकाळात जाणं अशक्य आहे. बर्मुडा ट्रँगलचा टाइम ट्रॅव्हलशी थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही.