Anushka Tapshalkar
पुरुषांच्या आधीच कार चालवून इतिहास घडवणारी महिला! कारच्या क्षमतेवर विश्वास ठेवून इतिहास घडवणारी महिला म्हणजे बर्था बेंझ.
Bertha Benz The First Driver in the World
sakal
बर्था बेंझ यांचा जन्म ३ मे १८४९ रोजी जर्मनीतील फॉर्झहाइम येथे झाला. त्या प्रसिद्ध अभियंता कार्ल बेंझ यांच्या पत्नी होत्या. पतीच्या कारनिर्मितीच्या प्रयोगांना त्यांनी आर्थिक आणि मानसिक पाठबळ दिलं.
Bertha Benz The First Driver in the World
sakal
१८८५ मध्ये कार्ल बेंझ यांनी पेट्रोलवर चालणारी तीन चाकांची Benz Patent Motorwagen तयार केली. मात्र, या वाहनावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. ही कार लांबचा प्रवास करू शकेल का, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
Bertha Benz The First Driver in the World
sakal
कारची उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी बर्था यांनी एक अनोखी योजना आखली. ५ ऑगस्ट १८८८ रोजी त्या आपल्या युजेन आणि रिचर्ड या दोन मुलांसह कारमधून प्रवासाला निघाल्या. विशेष म्हणजे, त्यांनी कार्ल यांना या योजनेची आधी कल्पनाही दिली नव्हती!
Bertha Benz The First Driver in the World
sakal
बर्था यांनी जर्मनीतील मॅनहाइम ते फॉर्झहाइम असा सुमारे १०६ किलोमीटरचा प्रवास केला
Bertha Benz The First Driver in the World
sakal
रस्ते वाहनांसाठी योग्य नव्हते. इंधन आणि पाण्याची कमतरता भासत होती, तर गाडीमध्ये तांत्रिक बिघाडही होत होते. बर्था यांनी फार्मसीमधून इंधन घेतलं आणि गरज पडल्यावर केसांच्या पिना व कपड्यांतील गार्टरचा वापर करून गाडीतील बिघाड तात्पुरते दूर केले.
Bertha Benz The First Driver in the World
sakal
प्रवासादरम्यान गाडीच्या लाकडी ब्रेकमध्ये बिघाड झाला. बर्था यांनी चांभाराकडून ब्रेकवर चामड्याचं अस्तर बसवून घेतलं. या घटनेचा संबंध पुढे आधुनिक ब्रेक लाइनिंगच्या विकासाशी जोडला जातो.
Bertha Benz The First Driver in the World
sakal
सुमारे १२ तासांच्या प्रवासानंतर बर्था आणि त्यांची मुलं सुरक्षितपणे फॉर्झहाइमला पोहोचली. या प्रवासामुळे मोटारगाडी लांब पल्ल्याचा प्रवास करू शकते, हे सिद्ध झालं. त्यांच्या या धाडसामुळे कारच्या विश्वासार्हतेबद्दल लोकांमध्ये उत्सुकता वाढण्यास मदत झाली.
Bertha Benz The First Driver in the World
sakal
२१ जुलै २०१६ रोजी बर्था बेंझ यांना Automotive Hall of Fame मध्ये स्थान देण्यात आलं. १९४४ मध्ये वयाच्या ९५व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मात्र, त्यांच्या धाडसाने आणि दूरदृष्टीने मोटारगाडीच्या इतिहासात कायमचं स्थान मिळवलं
Bertha Benz The First Driver in the World
sakal
WiFi Inventor Hedy Lamarr
sakal