Anushka Tapshalkar
आज आपण इंटरनेट, वायफाय आणि ब्लूटूथचा वापर अगदी सहज करतो. पण या तंत्रज्ञानाच्या विकासात हेडी लॅमर या हॉलीवूड अभिनेत्रीचं महत्त्वपूर्ण योगदान आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
WiFi Inventor Hedy Lamarr
sakal
हेडी लॅमर यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९१४ रोजी व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे झाला. त्यांचं खरं नाव हेडविग ईव्हा मारिया किस्लर असं होतं. त्या सौंदर्यासोबतच अभिनय आणि बुद्धिमत्तेसाठीही ओळखल्या जात होत्या.
WiFi Inventor Hedy Lamarr
sakal
हेडी यांनी हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. Algiers हा त्यांचा पहिला हॉलिवूड चित्रपट १९३८ मध्ये प्रदर्शित झाला. पुढे Samson and Delilah यांसारख्या चित्रपटांतूनही त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली.
WiFi Inventor Hedy Lamarr
sakal
अभिनयासोबतच हेडी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी संगीतकार जॉर्ज अँथेल यांच्यासोबत रेडिओ सिग्नल अधिक सुरक्षित ठेवण्याच्या तंत्रावर काम केलं.
WiFi Inventor Hedy Lamarr
sakal
हेडी लॅमर आणि जॉर्ज अँथेल यांनी Frequency Hopping या तंत्राची संकल्पना मांडली. यामध्ये रेडिओ सिग्नलची वारंवारता ठरावीक पद्धतीने बदलली जाते, ज्यामुळे शत्रूला सिग्नलमध्ये अडथळा आणणं कठीण होऊ शकतं. १९४२ मध्ये त्यांच्या या संशोधनाला पेटंट मिळालं.
WiFi Inventor Hedy Lamarr
sakal
हेडी लॅमर यांनी थेट वायफायचा शोध लावला नव्हता. मात्र, त्यांनी विकसित केलेल्या फ्रिक्वेन्सी हॉपिंगच्या संकल्पनेने पुढील काळातील वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञानाच्या विकासाला हातभार लावला. वायफाय आणि ब्लूटूथसारख्या तंत्रज्ञानाच्या इतिहासात त्यांच्या योगदानाला महत्त्वाचं स्थान आहे.
WiFi Inventor Hedy Lamarr
sakal
हेडी लॅमर यांचं २००० मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झालं. २०१४ मध्ये त्यांना National Inventors Hall of Fame मध्ये स्थान मिळालं, तर २०१५ मध्ये गुगलने डूडलद्वारे त्यांना आदरांजली वाहिली.
WiFi Inventor Hedy Lamarr
sakal
Ada Lovelace Computer History
sakal