Anushka Tapshalkar
आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे PCOS हा महिलांमध्ये वाढत असून, हार्मोनल असंतुलन, अनियमित पाळी, वजनात वाढ आणि त्वचेच्या समस्या यासारखी लक्षणे दिसून येतात.
योग हा शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी प्रभावी उपाय आहे. नियमित योगासने केल्याने हार्मोन्स संतुलित राहतात, वजन नियंत्रणात येते आणि तणाव कमी होऊन PCOS वर नियंत्रण मिळवणे सोपे होते. पुढे योगासने दिली आहेत जी PCOS नियंत्रणासाठी प्रभावी ठरतात.
हे आसन नियमित केल्याने मणक्याची लवचिकता वाढते, ओटीपोटातील स्नायूंना ताण बसतो आणि पचनसंस्था सुधारण्यास मदत होते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
हे योगासन नितंब (Hip) आणि मांडीचा सांधा मोकळा करून पुनरुत्पादक अवयवांना (Reproductive Organs) उत्तेजित करते, ज्यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते आणि हार्मोनल संतुलन राखले जाते.
या आसनामुळे मांड्यांच्या आतील भागास खोलवर ताण मिळतो, त्यामुळे शरीराचा खालील भाग आरामशीर स्थितीत जातो, पेल्व्हिक क्षेत्रातील रक्ताभिसरण सुधारते आणि शांत झोप लागण्यास मदत होते, ज्याचा मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो.
हे आसन शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करते, पचनसंस्था सुधारते आणि शरीर शुद्धीकरणाच्या प्रक्रियेस चालना देते, ज्यामुळे शरीर हलके आणि ताजेतवाने वाटते.
हे योगासन पाठीचा कणा मजबूत करून छाती उघडण्यास मदत होते, त्यामुळे श्वासोच्छ्वास सुधारतो, शरीर अधिक लवचिक होते आणि तणाव दूर होण्यास मदत मिळते.
योगासोबतच प्राणायाम हा हार्मोन असंतुलन नियंत्रणासाठी मदत करतो. अनुलोम-विलोम केल्याने श्वसनक्रिया सुधारते, रक्ताभिसरण सुरळीत होते, हार्मोनल संतुलन राखले जाते आणि शरीर अधिक ऊर्जावान आणि हलके वाटते.
या श्वसनतंत्रांमुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, तणाव कमी होतो, मन शांत राहते आणि एकूण मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळते, जे PCOS नियंत्रणासाठी महत्त्वाचे आहे.
हे आसन शरीराला संपूर्ण विश्रांती देण्यासाठी अत्यंत प्रभावी असून, मन शांत ठेवण्यासाठी मदत करते, तणाव आणि चिंता दूर करण्यास उपयुक्त ठरते आणि संपूर्ण शरीराला उर्जावान ठेवण्यास मदत करते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.