उन्हाळ्यातील किंग रेसिपी! रसाळ आंब्याचा आमरस बनवण्याची परफेक्ट पद्धत

Aarti Badade

उन्हाळ्याची गोड मेजवानी

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे आमरस! आमरस बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या.

Aamras Recipe

|

Sakal

आवश्यक साहित्य

८ पिकलेले रसाळ आंबे,१/३ कप पिठी साखर आणि १/२ कप दूध,१ चमचा तूप आणि २ चमचे सुकामेवा पूड,वेलची-जायफळ पूड आणि थोडी काळी मिरी पूड.

Aamras Recipe

|

Sakal

पहिली पायरी - पल्प तयार करणे

सर्वात आधी आंबे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर आंब्याचे साल काढून त्याचा सर्व गर (पल्प) एका भांड्यात काढून घ्या. हा पल्प मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदा फिरवून घ्या.

Aamras Recipe

|

Sakal

मसाल्यांची जोड

मटण किंवा गोड पदार्थात जशी चव महत्त्वाची असते, तशीच आमरसातही! आता वाटलेल्या पल्पमध्ये वेलची-जायफळ पूड आणि चवीसाठी थोडी काळी मिरी पूड व पिठी साखर घाला.

Aamras Recipe

|

Sakal

असा येईल रिच फ्लेव्हर!

आमरसाची चव अधिक वाढवण्यासाठी त्यात १ चमचा तूप, सुकामेव्याची पूड आणि अर्धा कप दूध घाला. दुधामुळे आमरसाचा रंग आणि पोत खूप छान येतो.

Aamras Recipe

|

Sakal

फायनल मिक्सिंग

सर्व साहित्य टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरमधून हे मिश्रण व्यवस्थित फिरवून घ्या. यामुळे सर्व घटक एकजीव होतील आणि तुमचा आमरस एकदम स्मूथ आणि चविष्ट तयार होईल.

Aamras Recipe

|

Sakal

आमरस सर्व्ह करा!

तयार झालेला थंडगार आमरस एका बाऊलमध्ये काढा. हा आमरस तुम्ही गरम गरम पुऱ्या किंवा चपातीसोबत सर्व्ह करू शकता. वरून थोडा सुकामेवा टाकून सजवा!

Aamras Recipe

|

Sakal

ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने शरीरात एक नाहीतर होतात अनेक बदल!

Dragon fruit benefits

|

Sakal

येथे क्लिक करा