Anushka Tapshalkar
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी वर्ल्ड अॅस्थमा डे साजरा केला जातो. यंदा 6 मे रोजी हा दिवस साजरा केला जाईल. 'Make Inhaled Treatments Accessible for ALL' ही या वर्षीची थीम आहे.
अॅस्थमा हा दीर्घकालीन श्वसनविकार असून यामध्ये श्वासविवर सुजतात व आकुंचित होतात, त्यामुळे श्वास घेणे कठीण होते. यात छातीत घरघर, खोकला आणि दडपण जाणवते.
नियमित श्वसन व्यायामामुळे फुफ्फुसांचे कार्य सुधारते, ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे अॅस्थमाच्या रुग्णांना आराम मिळतो.
नाकाने 2 सेकंद श्वास घ्या, ओठांच्या फटीतून 4 सेकंद श्वास बाहेर सोडा. दम लागणाऱ्या स्थितींमध्ये ही पद्धत उपयोगी ठरते कारण ती श्वास नलिकांना अधिक काळ उघडे ठेवण्यास मदत करते.
नाकाने खोल श्वास घेऊन पोट फुगवा आणि हळूहळू ओठांनी श्वास सोडा. दररोज 5 ते 10 मिनिटे या पद्धतीचा सराव केल्याने शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि श्वास घेण्याची ताकद वाढते.
या पद्धतीत श्वसनासोबत विश्रांतीचे व्यायाम केले जातात. नाकाने आणि डायाफ्रामद्वारे श्वास घेण्यामुळे मन व शरीर शांत राहते आणि श्वास घेणे सोपे होते.
ही पद्धत अॅस्थमासाठी खास असून नाकाने श्वास घेणे आणि श्वसनावर नियंत्रण ठेवणे यावर भर देते. यामुळे हायपरव्हेंटिलेशन कमी होऊन CO₂ ची पातळी संतुलित राहते.
हे व्यायाम अॅस्थमा नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत, पण औषधांचा पर्याय नाहीत. सराव सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
श्वसन व्यायाम आणि औषधं यांचे संतुलन ठेवून अॅस्थमा नियंत्रित ठेवता येतो.