Aarti Badade
भारतीय स्वयंपाकघरातील एक खास मसाला – दालचिनी. फक्त स्वादासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही ती अमूल्य आहे.
दालचिनीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातल्या तणावाशी लढतात व वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात.
हिच्यातील दाहक-विरोधी गुणधर्म सूज, सांधेदुखी व शरीरातील वेदना कमी करण्यात मदत करतात.
दालचिनी नियमित घेतल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो आणि ब्लड प्रेशर देखील संतुलित होतो.
ही इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते, त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या आजारांचा धोका कमी करण्यात दालचिनी उपयुक्त ठरते.
दालचिनीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत – संसर्ग दूर ठेवते. काही अभ्यासांनुसार, ती एचआयव्ही/एड्सवरही सकारात्मक परिणाम करू शकते.
दालचिनी थर्मोजेनेसिस वाढवते, पोटाची चरबी कमी करण्यात मदत करते. आरोग्यदायी वजनासाठी प्रभावी उपाय!
३ ते ६ ग्रॅम दालचिनी दररोज घ्या.ती पाण्यात भिजवून प्या, किंवा चहा-दुधात मिसळून घेऊ शकता.
दालचिनीचे फायदे अनेक, पण काही आरोग्यस्थितीत ती टाळावी लागू शकते. नेहमी वैद्यकीय सल्ला घ्या.