Anushka Tapshalkar
आशुतोष गोवारीकर हे प्रसिद्ध हिंदी तसेच मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आहेत.
15 फेब्रुवारीला त्याचा वाढदिवस असतो. आज त्यांचा 61वा वाढदिवस आहे.
आशुतोष गोवारीकरांनी आतापर्यंत अनेक वास्तविक आणि विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणारे प्रसिद्ध सिनेमे दिग्दर्शित आणि निर्मित केले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.
ब्रिटिश काळातील संघर्षाची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाने जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवली आणि भारताचा तिसरा ऑस्कर नामांकित चित्रपट ठरला.
2004 मध्ये फ्लॉप झाला असला तरी प्रेक्षकांकडून या चित्रपटाला खूप पसंती मिळत आहे. सुरुवातीला दुर्लक्षित राहूनही तो आज कल्ट क्लासिक मानला जातो.
आशुतोष गोवारीकर यांनी इतिहासप्रधान चित्रपट दिग्दर्शित करण्यापूर्वी, १९९५ मध्ये बाजी हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट त्याच्या रोमांचक कथानकासाठी ओळखला जातो.
जोधा अकबर हा हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांचा ऐतिहासिक चित्रपट आशुतोष गोवारीकर यांच्या उत्कृष्ट दिग्दर्शनाची झलक दाखवतो. तो आजही ऐतिहासिक चित्रपटप्रेमींच्या आवडीचा आहे.
2009 मध्ये आलेल्या व्हॉट्स युवर राशी? या रोमँटिक कॉमेडीमध्ये प्रियांका चोप्राने एकाच चित्रपटात 12 वेगवेगळ्या भूमिका साकारून नवा विक्रम रचला.