Apurva Kulkarni
'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. कोकणातील देवबाग इथं घरीच साखरपुडा सोहळा संपन्न झाला.
अंकिता संगीतकार कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधणार आहे. 16 फेब्रुवारीला त्यांचा साखरपुडा होणार आहे.
हिरवी काठापदराची साडी, भरजरी दागिन्यांमध्ये अंकिता खुलून दिसत आहे. तर कुणालने पांढरा कुर्ता आणि जॅकेटवर आहे.
फोटो शेअर करत अंकिताने 'देवाला माहित होतं की माझ्या हृदयाला तुझी गरज आहे' असं तिने कॅप्शन दिलय.
अंकिताच्या साखरपुड्यात रिंग प्लॅटरही खूप छान सजवण्यात आलं होतं.
कोकण थीमचं रिंग प्लॅटर होतं. अंकिताने त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केलेत.
नारळाचं झाड, आंब्याचं झाड, आंब्याच्या पेट्या आणि अंगठ्या अशा प्रकारे रिंग प्लॅटर सजवण्यात आलं होतं.
अंकिता आणि कुणाल गेल्या काही वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. आता 16 फेब्रुवारीला ते लग्नगाठ बांधणार आहेत.