Saisimran Ghashi
हल्ली जास्त ताणतनाव, खराब पाणी अशा अनेक कारणांमुळे केसगळती होते
तसेच कोंडा होण्याची समस्यादेखील केसांच्या अनेक समस्या निर्माण करते
आम्ही तुम्हाला असे घरगुती तेल सांगणार आहे ज्याने या समस्या कायमच्या दूर होतील
"कढीपत्ता आणि भृंगराज तेल" हे तेल केसगळती, कोंडा आणि केसांची वाढ यावर अतिशय प्रभावी आहे.
हे तेल तयार करण्यासाठी २ मोठी मूठ कढीपत्ता, १ मूठ भृंगराजाची पाने आणि बेससाठी खोबरेल तेल वापरा.
हे सर्व एकत्र करून मंद आचेवर ८–१० मिनिटं उकळा. मिश्रण थंड झाल्यावर गाळून एका काचेच्या बाटलीत साठवा.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट करून तेल स्काल्पमध्ये बोटांनी मसाज करा. रात्रभर ठेवून सकाळी हर्बल शाम्पूने धुवावे. अधिक चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून ३ वेळा वापरा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.